24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयभरतीत अपयशी ठरलेल्या २३ वर्षीय युवकाची आत्महत्या

भरतीत अपयशी ठरलेल्या २३ वर्षीय युवकाची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

गढवाल : केंद्रातर्फे काही दिवसांपूर्वी लष्करात भरती होण्यासाठी अग्नीवीर योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर या विरोधात देशभरात मोठा गदारोळ माजला होता. या सर्वामध्ये अनेकांनी यामध्ये भरती होण्यासाठी अर्जदेखील केले होते. त्यातील एका उमेदवाराने या भरती परीक्षेत अपयश आल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमित कुमार असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून, हा युवक उत्तराखंड येथील पौरी गढवाल जिल्ह्यातील नौगाव कमंडा गावचा रहिवासी होता.

सुमित अग्निवीर भरती मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोटद्वारला गेला होता. पुढीलवर्षी तो या योजनेत भरती होण्यासाठी पात्र ठरणार नव्हता. यंदाची परीक्षेला बसण्याची ही त्याची शेवटची संधी होती. मात्र, त्यातही तो अपयशी झाला. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अस्वस्थ झालेला सुमित घरी परतला होता. त्यानंतर त्याने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले आणि कोणाशीही काही बोलले नाही. दुस-या दिवशी त्याच्या कुटुंबीयांना सुमित त्याच्या खोलीच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सुमितच्या पालकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला अशी माहिती सातपुलीचे उपजिल्हा दंडाधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या