21.2 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home राष्ट्रीय जिल्हा व सत्र न्यायाधीशांची आत्महत्या

जिल्हा व सत्र न्यायाधीशांची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

रायपूर : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आत्महत्यांच्या सत्रांमुळे देश ढवळून निघाला आहे. त्यात आज पुन्हा एकदा अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील मुंगेली येथे तैनात असलेल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश कांता मार्टिन यांनी रविवारी आत्महत्या केली.

त्यांनी स्वत:च्या घरामध्ये साडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस रविवारी त्यांच्या अधिकृत बंगल्याचा दरवाजा तोडत आता शिरले, यावेळी कांता मार्टिन यांचा मृतदेह लटकलेला आढळला. महिला न्यायाधीशांनी आत्महत्या का केली याबाबत नेमकी माहिती मिळाली नाही.

मुंगेलीचे एसपी अरविंद कुजूर यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार न्यायाधीश कांता मार्टिन घरात एकट्याच राहत होत्या. एकाकीपणामुळे त्या नैराश्यात गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानविरोधात मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा मांडावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या