21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयक्लार्कच्या घरात नोटांनी भरलेल्या सुटकेस

क्लार्कच्या घरात नोटांनी भरलेल्या सुटकेस

एकमत ऑनलाईन

८५ लाखांची रोकड जप्त, सोने, चांदीचे दागिनेही ताब्यात
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील बैरागढ भागात आर्थिक गुन्हे शाखेने एका लिपिकाच्या घरी छापा टाकला असून, त्याच्या घरी नोटांनी भरलेल्या सुटकेस सापडल्या. या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत ८५ लाख रुपयांची रोकड आणि सोने-चांदी जप्त केली आहे. एका लिपिकाची इतकी कमाई पाहून अधिकारीही चकित झाले. पहाटे ५ ते ६ वाजता अधिकारी लिपिकाच्या घरी पोहोचले. आता १६ तासांनंतरही त्या लिपिकाच्या घरी छापेमारी सुरू आहे.

सातपुडा भवनमधील वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपीक हिरो केसवानी यांच्या बेहिशोबी मालमत्तेच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सातत्याने येत होत्या. यानंतर ईओडब्ल्यूने तक्रारीची पडताळणी केली आणि त्यानंतर बुधवारी पहाटे बैरागढच्या मिनी मार्केटमधील हिरो केसवानी यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान ईओडब्ल्यूचे डझनभर अधिकारी हिरो केसवानी यांच्या घरी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या घरातून सुटकेसमधून तब्बल ८५ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली, तर काही मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. याशिवाय सोने-चांदीही सापडले आहे. अजूनही त्यांच्या घरी अधिकारी छापेमारी करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ईओडब्ल्यूकडे सातपुडा भवनमध्ये नियुक्त वरिष्ठ लिपिकाच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे ईओडब्ल्यूने ही मोठी कारवाई केली.

कधीकाळी फक्त ४ हजार रुपये दर महिना पगार
या लिपिकाचा सुरुवातीला पगार फक्त ४ हजार रुपये असल्याची माहिती आहे आणि सध्या त्याचा पगार ५० हजार रुपये दर महिना आहे. त्यामुळे त्याच्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडणे हे हैराण करणारे आहे.

लिपिकाची तब्येत बिघडली
बैरागढ परिसरातील मिनी मार्केट रोडवर असलेल्या या सरकारी कर्मचारी हिरो केसवानी यांच्या घरावर ईओडब्ल्यूने छापा टाकला. हिरो केसवानी यांना ही समजताच त्यांची तब्येत खराब झाली. त्यानंतर हिरो केसवानी यांना उपचारासाठी बैरागढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या