15.7 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeउद्योगजगतइन्फोसिसचे सीईओ पारेख यांना समन्स

इन्फोसिसचे सीईओ पारेख यांना समन्स

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स विभागाच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये वारंवार अडचणी येत आहेत. परंतू हे पोर्टल तयार केलेल्या इन्फोसिस ही आयटी कंपनी यातील अडचणी अद्याप सोडवू शकलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रालयाने इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलिल पारेख यांना समन्स बजावले आहे. या समन्समध्ये म्हटले आहे की, इन्कम टॅक्सच्या पोर्टलला लॉन्च होऊन दोन महिने झाले तरी अद्याप यातील अडचणी दूर का झालेल्या नाहीत? याबाबत सलील पारेख यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना स्पष्टीकरण द्यावे.

इन्कम टॅक्सचे नवीन ई-फाईलिंग पोर्टलचा मोठा गाजावाजा करत ७ जून रोजी लॉन्च करण्यात आले होते़ पण आता दोन महिने झाले तरी ते सुरळीतपणे चालत नाही. त्यात अद्यापही अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर इन्फोसिसच्या सीईओ-एमडी सलील पारेख यांना समन्स पाठवण्यात आले असून २३ ऑगस्ट रोजी याबाबत खुद्द अर्थमंत्र्यांसमोर त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. २१ ऑगस्टपासून तर हे पोर्टल पूर्णपणे ठप्पच आहे. अशा आशयाचे ट्विट स्वत: इन्कम टॅक्स विभागाकडून करण्यात आले आहे.

सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या