21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयनगरोटा एन्काउन्टरवरुन पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स

नगरोटा एन्काउन्टरवरुन पाकिस्तानी उच्चायुक्तांना समन्स

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील नगरोटा भागात चार दहशतवाद्यांच्या एन्काउन्टरनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक धोरण स्वीकारले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स धाडले आहे.

नगरोटामध्ये एन्काउन्टरमध्ये ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून अनेक ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यावरुन पाकिस्तानला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. ठार झालेले चारही जण दहशतवादी ‘जैश ए मोहम्मद’ या संघटनेशी निगडीत होते.

नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधात एक उच्चस्तरीय बैठक बोलवून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी, त्यांनी सुरक्षा दलाच्या समयसूचकतेचे कौतुकही केले होते.

मत कोणालाही द्या सरकार भाजपाचेच बनते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या