31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयओडिशात आनंदकुमार यांच्या प्रेरणेतून सुपर १९ यशोगाथा

ओडिशात आनंदकुमार यांच्या प्रेरणेतून सुपर १९ यशोगाथा

सेवाभावी संस्थेचे सर्व १९ विद्यार्थी नीटच्या गुणवत्ता यादीत; सुपर ३० ची पुनरावृत्ती घडली

एकमत ऑनलाईन

भुवनेश्वर : बिहारमधील आनंदकुमार यांच्या सुपर ३० च्या धर्तीवर ओडिशातील एका सेवाभावी संस्थेने राबविलेल्या सुपर १९ ला घवघवीत यश मिळाले असून नीट परीक्षेत सर्व १९ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान मिळविले आहे. जेईई प्रवेशासाठीच्या परीक्षेत वंचित मुलांना यश मिळण्यासाठी ज्याप्रमाणे बिहारमध्ये आनंदकुमार यांनी सुपर ३० उपक्रम राबवला़ त्याप्रमाणे आता ओडिशात नीट परीक्षेत वंचित मुलांना चांगले यश मिळावे यासाठी जिंदगी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली त्यांचे १९ गरीब विद्यार्थी यंदाच्या नीट या वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेत चमकले आहेत.

जिंदगी हा गट शिक्षणतज्ज्ञ अजय बहादूर सिंह यांनी स्थापन केला असून, त्यांनी गरिबीत दिवस काढले आहेत. बालपणी त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागले. त्यांच्याजवळ पैसेही नसायचे. जिंदगी उपक्रमात ओडिशातील गरीब मुलांना ते नीट परीक्षेचे प्रशिक्षण देत आहेत. बिहारमध्ये गणितज्ज्ञ आनंदकुमार यांनी जेईई परीक्षेत गरीब मुलांना यश मिळावे यासाठी असाच सुपर ३० उपक्रम राबवला होता़ त्यात वंचित गटातील ३० विद्यार्थ्यांना ते जेईईचे प्रशिक्षण देत असत.

या यशस्वी विद्यार्थ्यांत अंगुल जिल्ह्यातील खिरोदिनी साहू हिचा समावेश आहे. तिचे वडील शेतमजूर आहेत. त्यांची नोकरी कोरोना काळात गेली होती. मजूर ते वडा विकणा-यांची मुले गुणवत्ता यादीत नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला होता़ त्यात मजूर, भाजी विक्रेते, ट्रक चालक, मच्छिमार, इडली वडा विक्रेते यांची मुले यशस्वी झाली आहेत. त्याचे श्रेय जिंदगी विश्वस्त गटाला आहे.

विद्यार्थ्यांनी इतिहास घडविला
यंदाच्या नीट २०२० परीक्षेत जिंदगी उपक्रमातील १९ पैकी १९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून त्यांनी इतिहास घडवला आहे, असे सिंह यांनी सांगितले.

२०१८ मध्ये १४ पैकी १२ पात्र ठरले होते
२०१८ मध्ये या संस्थेचे १४ पैकी १२ विद्यार्थी नीट परीक्षेत पात्र ठरले होते. सुपर ३०चे प्रमुख गणितज्ञ आनंदकुमार यांनी जिंदगी फाउंडेशनला भेट दिली आहे. चित्रपट अभिनेता हृतिक रोशन याने सुपर ३० चित्रपटात आनंदकुमार यांची भूमिका केली होती. त्यांनीही ओडिशातील जिंदगी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले आहे.

भारतात कोरोना विषाणूच्या स्वरुपात मोठा बदल नाही – केंद्रसरकारची माहिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या