24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeराष्ट्रीयनव्या संसदेच्या बांधकामावर सर्वोच्च न्यायालय नाराज

नव्या संसदेच्या बांधकामावर सर्वोच्च न्यायालय नाराज

सर्व बांधकाम थांबवण्याचे आदेश ; याचिकांवर निर्णय येऊ द्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नव्या संसद भवनाच्या भूमिपूजन सोहळयाच्या आयोजनावरुन नाराजी व्यक्त केली आहे. सदर प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यांची सुनावणी होईपर्यंत बांधकाम करु नये असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सेंट्रल विस्टा या प्रकल्पाचे भूमिपूजन १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे. मात्र संसदेच्या पुनर्बांधणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केंद्राने या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्याचवेळी १० डिसेंबरच्या कार्यक्रम करण्यास काही हरकत नसल्याचेही नमूद केले आहे. मात्र न्यायालयातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेशही न्यायलयाने दिले आहेत.

दिल्लीत मध्यभागी बांधकामावर संताप
सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना या वास्तूचे कोणतेही बांधकाम होणार नाही यासंदर्भात खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीच्या मध्यभागी हा प्रकल्प उभारला जाणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायलयाच्या आजच्या निकालानुसार बांधकामावर तात्पुरती स्थगिती आली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या प्रकल्पाच्या बांधकामाचे काम सुरु करण्यासंदर्भात बाजू मांडण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ दिला होता. मात्र याबाबत काही प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच दिल्लीच्या मध्यभागी बांधकाम सुरु करण्यासंदर्भातील केंद्राच्या निर्णयावर न्यायलयाने संताप व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाने भूमीपूजनाला परवानगी दिली असली तरी या कार्यक्रमा व्यतिरिक्त नवीन संसद भवनासंदर्भात कोणतेही काम न करण्याचे निर्देश दिले. कोणतेही बांधकाम पाडणे किंवा उभारणे, प्रकल्पाच्या जागेवर वृक्षतोड करणे या सर्व गोष्टींना स्थगिती दिली आहे.

केंद्रसरकारकडून न्यायालयाला आश्वासन
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकल्पाच्या ठिकाणी कोणतेही बांधकाम, तोडकाम किंवा झाडांचे स्थलांतर केले जाणार नाही, अशी हमी केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयासमोर दिली आहे.

९७१ कोटी रुपयांचा खर्च
नव्या संसदेची इमारत ही आत्मनिर्भर भारताचे मंदिर असेल. यामध्ये भारतातील विविधतेचे दर्शन घडेल. जुन्या संसद भवनाच्या इमारतीपेक्षा नवी इमारत १७,००० स्केअर फूट मोठी असेल. एकूण ६४,५०० स्केअर मीटर जागेत ही वास्तू उभारली जाणार आहे. यासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार असून टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कडे या इमारतीच्या उभारणीचे कंत्राट दिले आहे. एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीने या इमारतीचे डिझाईन बनवले आहे, अशी माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी दिली होती.

आंदोलकांकरिता मुस्लिम तरुणांनी सुरू केली लंगर सेवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या