17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeउद्योगजगतमुकेश अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

मुकेश अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल आणि किशोर बियानी यांचा फ्युचर ग्रुपमध्ये २४ हजार ७१३ कोटींचा करार झाला होता. आता या प्रकरणी मुकेश अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. या करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अमेझॉनच्या बाजूने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायलयाने सांगितले की, या प्रकरणी निर्णय लागू करणे योग्य आहे. इमर्जन्सी आर्बिट्रेटरने फ्युचर रिटेलच्या करार स्थगित करण्याचा आदेश दिला होता.

सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले की, फ्युचर रिटेलसोबत रिलायन्सचा करार स्थगित करण्याचा आदेश आॅर्बिट्रेटरने दिला होता. तो लागू करण्यायोग्य आहे. फ्यूचर रिटेलने त्यांचा पूर्ण बिझनेस रिलायन्स रिटेलला विकला होता. अमेझॉनने रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपच्या करारासंदर्भात वेगवेगळ्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. सिंगापूर इंटरनॅशनल आॅर्बिट्रेटर सेंटरला इमर्जन्सी आॅर्बिट्रेटर म्हटले जाते. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमधील डीलविरोधात अमेझॉनने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली.

अमेरिकेच्या कंपनीवर लावला आरोप
सर्वोच्च न्यायालयाने यावर आज सुनावणी केली. न्यायमूर्ती आर एफ नरीमन यांच्या पीठाने सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय घेतला. भारताच्या अँटिट्रस्ट रेग्युलेटरने अमेरिकी कंपनीवर आरोप लावला होता की जेव्हा कंपनीने फ्यूचर ग्रुपमध्ये गुंतवणुकीची मंजुरी मागितली होती, त्यावेळी कंपनीने तथ्य लपवले होते. तसेच खोटी माहिती देण्यात आली होती. न्यायालयाने बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय दिला.

आता जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन लवकरच भारतात येणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या