24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयसर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक दिवस; सुनावणीचे पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक दिवस; सुनावणीचे पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा आज म्हणजेच २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. रमण्णा हे निवृत्त होत असताना सुनावणीदरम्यान पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे.
फ्रीबी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आज थेट प्रक्षेपित होणार आहे. निवर्तमान सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील सेरेमोनिअल बेंचसमोर खटले चालवले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २० केसेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी हे केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, आज सकाळी १०:३० वाजल्यापासून सरन्यायाधीशांच्या न्यायालयाचीकिंवा औपचारिक खंडपीठाची कार्यवाही रमण्णा हे निवृत्त होत असताना त्यांनी त्यांचे नावे एक मोठा रेकॉर्ड केला आहे. न्यायपालिकेत आतापर्यंत सर्वात जास्त न्यायाधीशांची नेमणूक करणा-या सरन्यायाधिशांच्या यादीत रमण्णांचा पहिल्या क्रमांकावर आले आहेत. त्यांनी एक वर्षाहून कमी कालावधीत १०० पेक्षा जास्त न्यायाधिशांची नेमणूक हायकोर्टात आणि पाचपेक्षा जास्त न्यायाधीशांची सुप्रीम कोर्टात नेमणुक केलेली आहे. त्यामुळे आता निवृत्त होत असताना त्यांनी न्यायाधिशांच्या नियुक्त्यांबाबतचा एक मोठा विक्रम त्यांच्या नावावर केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या