22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home राष्ट्रीय सुप्रीम कोर्ट : क्वारंटाईनची सुटी समजून वेतन कापता येणार नाही

सुप्रीम कोर्ट : क्वारंटाईनची सुटी समजून वेतन कापता येणार नाही

एकमत ऑनलाईन

डॉक्टर, आरोग्य कर्मचा-यांना वेळेवर वेतन द्या

नवी दिल्ली : आरोग्य कर्मचा-यांना सुरक्षा, सुविधा आणि वेतन देण्याच्या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोग्य कर्मचाºयांना वेळेवर वेतन न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, दिल्ली, त्रिपुरा, पंजाब आणि कर्नाटक सरकारला धारेवर धरले आहे आणि डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांचे क्वारंटाईन दिवस हे काही सुटीचे दिवस नाहीत, असे बजावताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांचा क्वारंटाईन वेळ सुटी घोषित करून त्यांचा पगार कापला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारला यावर स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. आरोग्य कर्मचाºयांना वेतन वेळेवर मिळेल, हे निश्चित करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे. दिल्ली, त्रिपुरा, पंजाब, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफला सेवा-सुविधा पुरवतानाच वेळेवर सुटी दिली जावी. सोबतच वेतन आणि भत्ते त्यांना वेळेवर दिले जावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारने केंद्राच्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. केंद्र यासाठी असहाय्य नाही, ते कारवाईसाठी मोकळे आहेत, अशी समजही न्यायालयाने दिली.

केंद्राच्या आदेशाचे पालन होत नाही!
क्वारंटाईनचा काळ ही काही सुटी नाही, हे अगोदरपासूनच स्पष्ट आहे, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले. दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब आणि कर्नाटक राज्याने केंद्राच्या निर्देशांचे पालन केले नसल्याचेही तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर म्हटले. यावर न्यायालयाने केंद्राला संबंधित राज्यांकडून दिशानिर्देशांचे पालन करवून घेऊन येत्या १० आॅगस्टपर्यंत अहवाल सोपवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० आॅगस्ट रोजी होणार आहे.

Read More  याकतपूर रस्त्यावर दीड लाख रुपयांचे मद्य जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow