30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home राष्ट्रीय सर्वाेच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर ताशेरे

सर्वाेच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर ताशेरे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्­ली :गुजरातमधील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीच्या प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने गुजरात सरकारची चांगलीच कानउघडणी केली आहे. आगीच्या कारणांची लपवालपव केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. गुजरातमधील राजकोटमधील कोविड रुग्णालयात गुरुवारी लागलेल्या आगीत ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. गुजरातमध्ये अशाप्रकारच्या घटन वारंवार घडूनही राज्यसरकारकडून पुरेशी काळजी घेण्यात आली नाही ,असा ठपका न्यायालयाने ठेवला.

विद्युत अभियंत्याचा अहवाल सरकारविरोधात
न्यायमुर्ती अशोक भूषण,आर. सुभाष रेड्डी व एम.आर. शहा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी सुरु आहे. सरकारकडून सर्व ठीक असल्याचे सांगणे खेदजनक असून रुग्णालयातील आगीप्रकरणी सरकारनेच नेमलेल्या विद्युत अभियंत्याने मात्र रुग्णालयातील वायरिंग चांगले नसल्याचे म्हटले आहे. तथ्य लपविण्याचा प्रकार सरकारकडून होत असून आगीच्या घटनांबाबत तपासणी करणारा आयोगही सरकारने गुंडाळून ठेवला असल्याबद्दल खंडपीठाने राज्य सरकारची चांगलीच कानउघडणी केली.

पुन्हा तपासणी करा
तथ्य लपविण्याची सरकारची भुमिका चुकीची असल्याचे ताशेरे ओढत खंडपीठाने गुजरात सरकारचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांना प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करण्याची व त्यासंबंधी योग्य अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले.

देशभरात लसीकरण नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या