24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयवसीम रिझवी-यती नरसिंहानंदांच्या अटकेची याचिका स्वीकारण्यास ’सर्वोच्च’ नकार

वसीम रिझवी-यती नरसिंहानंदांच्या अटकेची याचिका स्वीकारण्यास ’सर्वोच्च’ नकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जितेंद्र त्यागी ऊर्फ ​​वसीम रिझवी आणि यती नरसिंहानंद यांना अटक करण्याची मागणी करणाऱ्या भारतीय मुस्लिम शिया इस्ना अशारी जमातच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. त्यागी यांच्या ‘मुहम्मद’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही याचिकाकर्त्यानं केली.

याआधी रिझवी यांनी यूट्यूब चॅनलवरील संभाषणात अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आपल्या पुस्तकाबाबत ते म्हणाले, मुस्लिमांसह जगातील प्रत्येक व्यक्तीनं माझं पुस्तक वाचलं पाहिजे. जर कोणी हे पुस्तक वाचलं, तर तो इस्लाम स्वीकारणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींचे ३५० संदर्भ दिले आहेत, असा त्यांचा दावा आहे. हे पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. मला जी लपलेली तथ्ये पटकन सापडत नव्हती, ती सापडली असून ती पुराव्यासह अधोरेखित केली आहेत, त्यात पुस्तकांचे ३५० संदर्भ आहेत, असंही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या