26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयजबरदस्तीने ड्रग्ज देऊन सुशांतची हत्या

जबरदस्तीने ड्रग्ज देऊन सुशांतची हत्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण व बॉलिवुड ड्रग्ज कनेकशन यांचा संबंध यांचा तपास सध्या सुरु आहे. दरम्यान या प्रकरणावर बाबा रामदेव यांनी वादग्रस्त टीप्पणी केली आहे. ‘सुशांतला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्याची हत्या करण्यात आली. एनसीबी लवकरच ख-या गुन्हेगारांना शोधून काढेल याची आम्हाला खात्री आहे.’ अशी टीप्पणी त्यांनी केली आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबा रामदेव यांनी हे मत व्यक्त केले.

सुशांतसिंह राजपुत मृत्यूप्रकरणाच्या तपासात ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आले. गेल्या काही दिवसात अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे सारा अली खान, रकुल प्रित सिंह, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, अबिगल पांडे आदींची चौकशी करण्यात आली. आणखीही काही बड्या अभिनेत्शसंची नावे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाब रामदेव यांनी यावर प्रतिक्रिया दिली. सुशांतला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्याची हत्या करण्यात आली, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. बाबा रामदेव म्हणाले, ‘सुशांत एक महत्वाकांक्षी कलाकार होता. त्याला आयुष्यात खूप काही मिळवायचे होते. नियोजनबद्ध आयुष्य जगणारा व्यक्ती कधीच आत्महत्या करणार नाही. तो ज्या बॉलिवूडमध्ये काम करत होता ते क्षेत्र ड्रग्जसारख्या वाईट सवयींनी बरबटलेले आहे. सुशांतला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्याची हत्या करण्यात आली. एनसीबी लवकरच ख-या गुन्हेगारांना शोधून काढेल याची आम्हाला खात्री आहे.’

आरे वृक्षबचाव आंदोलकांवरील गृन्हे मागे !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या