मुंबई : अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाने AIIMS च्या अहवालानंतर वेगळं वळण घेतलं आहे. सुशांतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरू असलेली जोरदार चर्चा थंडावली होती. या अहवालानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने महत्त्वाचं वक्तव्य दिलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असून सीबीआय सर्वच शक्यतांचा तपास अतिशय काळजीपूर्वक करत असल्याचं मत सीबीआयच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं आहे.
याआधी सुशांत सिंहच्या कुटुबीयांकडून सीबीआयच्या तपासाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती. सीबीआय नेमका काय तपास करत आहे हेच कळत नाही असं सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी म्हटलं होतं.
पुलवामा मध्ये पंपोर बायपासजवळ दहशतवादी हल्ला; 2 सीआरपीएफ जवान शहीद