30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयसुशील चंद्रा नवे निवडणूक आयुक्त

सुशील चंद्रा नवे निवडणूक आयुक्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सुशील चंद्रा हे देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतील. सरकारने देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. चंद्रा हे मंगळवार, दि. १३ एप्रिलला मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतील. यासंबंधी आदेश जारी करण्यात आले आहेत. सुनील अरोरा हे आधी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. आता त्यांच्या जागी सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ हा १३ मे २०२२ पर्यंत असेल.

मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी सुशील चंद्रा हे सीबीडीटीचे अध्यक्ष होते. सुशील चंद्रा यांच्या अध्यक्षतेत निवडणूक आयोगाने यापूर्वी मणिपूर, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका घेतल्या होत्या. या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ आता पुढच्या वर्षी मार्चमध्ये वेगवेगळ्या तारखांवर पूर्ण होत आहे. यात उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ पुढच्या वर्षी १४ मे रोजी पूर्ण होत आहे.

सुशील चंद्रा १९८० च्या बॅचचे आयआरएस अधिकारी
सुशील चंद्रा हे १९८० च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. रुरकी विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी डेहराडूनच्या डीएव्ही कॉलेजमध्ये एलएलबीची पदवी घेतली. आंतरराष्ट्रीय कर रचनेच्या विषयावर त्यांची मजबूत पकड आहे.

राज्यातील न्यायालये रविवारपर्यंत बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या