24 C
Latur
Monday, June 21, 2021
Homeराष्ट्रीयसुवेंदू अधिकारी ११ आमदारांसह भाजपात

सुवेंदू अधिकारी ११ आमदारांसह भाजपात

तृणमूल काँग्रेसला मोठा हादरा; ममतांचे विश्वासू होते अधिकारी

एकमत ऑनलाईन

मिदनापूर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विश्वसनीय सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल ११ आमदारांसह टीएमसीला सोडचिठ्ठी देत आज भारतीय जनता पक्ष(भाजप)मध्ये प्रवेश घेतल्याने ममता बॅनर्जी यांना मोठा हादरा बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) जोरदार हादरा बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात आता आणखी एक नाव जोडले गेले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासातले समजले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे़ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मिदनापूर इथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अधिकारी यांच्यासोबत तृणमूलच्या काही आजी-माजी आमदारांनीही पक्षात प्रवेश केला आहे. अधिकारी यांचा भाजप प्रवेश हा बंगालमध्ये तृणमूलला मोठा हादरा मानला जातो आहे़

अधिकारी यांच्यासोबत ११ आमदार आणि काही माजी खासदारांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. यात तृणमूल, काँग्रेस आणि काही डाव्या पक्षांच्या आमदारांचाही समावेश आहे. ऐकेकाळी अधिकारी हे ममतांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्रिपदाचा आणि तृणमूलच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. अंतर्गत वाद आणि पक्षातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

पराभवानंतर माझ्याकडे शब्द नाहीत – मानहानीकारक पराभवानंतर विराटची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या