27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयहरयाणामधील भाजप सरकारवर टांगती तलवार

हरयाणामधील भाजप सरकारवर टांगती तलवार

एकमत ऑनलाईन

चंदिगड : गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरियाणात स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. जननायक जनता पार्टीच्या दुष्यंत चौटालांनी पाठिंबा दिल्याने भाजप सरकार बनले होते. मात्र सध्या दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला वाढत्या प्रतिसादानंतर दुष्यंत चौटालांच्या मनात चलबिचल सुरु झाली असून एमएसपी न मिळाल्यास राजीनामा देणार असे वक्तव्य त्यांनी केल्याने भाजप सरकारवर कधीही कोसळण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. जेजेपीने भाजपाला पाठिंबा देऊन पुन्हा एकदा मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले होते. दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री झाले होते.

मात्र आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा राजकारण नाट्यमय वळण घेत आहे. शेतकरी आंदोलनावरून हरियाणात केंद्रसरकारविरोधात जनमानस तयार होत आहे. जेजेपीचे आमदार असलेल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वातावरण ढवळून निघाले आहे. मतदारसंघातील विरोधाची कुणकुण पक्षाच्या आमदारांना जाणवू लागल्याने ते पक्षप्रमुख चौटाला यांच्याकडे राज्यसरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत आग्रह करु लागले आहेत. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनाही त्यामुळे धोकादायक परिस्थिती जाणीव होऊ लागली आहे. नुकतीच त्यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली आहे. आमच्या पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आधीच स्पष्ट केले होते की, शेतक-यांना एमएसपी मिळायला हवा.

काल केंद्र सरकारने जो लेखी प्रस्ताव दिला, त्यामध्ये एमएसपीचा देखील समावेश आहे. बैठकीत त्यांनी मी उपमुख्यमंत्री आहे, तोपर्यंत शेतक-यांना एमएसपी मिळवून देण्याचे काम करेन. मला ते न मिळाल्यास मी राजीनामा देईन, असे वक्तव्य केले असल्याचे समजते आहे. परिणामी शेतकरी आंदोलनाची धग आणखी तीव्र झाली तर भाजपच्या हरियाणातील सरकारला धोका निर्माण झाला आहे.

काँग्रेसकडून अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली ?
दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा हे सुद्धा या परिस्थितीचे वारे जोखाळून पुन्हा कार्यशील झाले आहेत. काँग्रेस राज्य सरकारविरोधात अविश्वास ठराव आणू शकते, असे सांगितले जात आहे.

भाजपला हवेत पाच आमदार
सध्या हरयाणा विधानसभेत सत्ताधारी भाजप ४० जागांसह सर्वात मोठी पार्टी आहे. काँग्रेसकडे ३१ जागा आहेत. जेजेपीने १० जागा जिंकल्या होत्या. याशिवाय हरयाणा लोकहित पार्टी १, आयएनएलडी १ आणि ७ जागा इतरांच्या खात्यात गेल्या होत्या. जेजेपीने पाठिंबा काढल्यास भाजपला सरकार टिकविण्यासाठी पाच आमदारांची गरज पडणार आहे.

फीबाबत दबाव आणल्यास संस्थांवर कारवाई – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या