25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeराष्ट्रीययूपीत भाजपच्या आमदारांवर टांगती तलवार

यूपीत भाजपच्या आमदारांवर टांगती तलवार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला विलक्षण वेग देणा-या भाजप नेतृत्वाने तिकीट वाटपाची ठोस पूर्ववतयारीही सुरू केली असून आगामी निवडणुकीत समाधानकारक कामगिरी नसणा-या किमान सत्तारूढ ७५ आमदारांचे यंदा तिकीट कापण्याची वेळ येऊ शकते. भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा यांनी गेले दोन दिवस उत्तर प्रदेशातील भाजप खासदारांशी चर्चा केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व दोन्ही मुख्यमंत्री यावेळी हजर होते.

वाराणसीचे खासदार व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही काल काही काळ व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाल्याचे कळते. कोरोनाच्या दुस-या लाटेत नागरिकांचे जे भीषण हाल झाले त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तमाम खासदारांना नजीकच्या काळात आपापल्या मतदारसंघांत जन आशीर्वाद यात्रा काढण्याचे निर्देश भाजप नेतृत्वाने दिले आहेत. जनतेशी कायम संवाद ठेवावा, असेही त्यांना बजावण्यात आले आहे. हेच निर्देश आमदारांसाठी आहेत आणि इथेच खरी मेख आहे. उत्तर प्रदेशात अलीकडे एका खासगी संस्थेकडून भाजपच्या ३०५ आमदारांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण केले गेले.

या खासगी संस्थेच्या तर्फे प्रत्येक मतदारसंघात नागरिकांच्या प्रातिनिधीक प्रतिक्रिया घेतल्या गेल्या. गोपनीय पद्धतीने सारी प्रक्रिया पार पडली व संबंधित बहुतांश आमदारांनाही याची कल्पना नव्हती. उत्तर प्रदेश केवळ २०२२ च्या नव्हे तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीही कळीचे राज्य असल्याने भाजप व संघपरिवार थोडाही धोका स्वीकारण्यास तयार नाही.

संघानेही नोंदविले आपले मत
आमदारांच्या कामगिरीबद्दल संघानेही वेगळा फीडबॅक घेतला आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही वेळोवेळी आमदारांशी चर्चा करून विकास कामांचा आढावा घेतला आहे. या सर्व मंथनानंतर सुमारे ५० ते ७५ आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. आमदारांचे हे रिपोर्ट कार्ड काटेकोरपणे व पूर्णत: त्यांच्या कामगिरीच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. यात व्यक्तिगत भाग नाही, असे सूत्रांनी नमूद केले.

 

पी.व्ही.सिंधूने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या