20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeराष्ट्रीयकुटुंबाला मारहाण; चिमुरडीचा मृत्यू

कुटुंबाला मारहाण; चिमुरडीचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

पुडुकोट्टाई : तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. इथे गावक-यांच्या जमावाने सहा जणांच्या कुटुंबाचा पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण केली. जमावाने केलेल्या हल्ल्यात कुटुंबातील अवघ्या १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. गावक-यांनी या कुटुंबावर मंदिरातून वस्तू चोरल्याचा आरोप केला.

जमावाने कुटुंबाला मारहाण केल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. १४
नोव्हेंबरला तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यातील किल्लानूर गावाजवळ मंदिरात चोरी करत असतानाचा एक व्हीडीओ व्हायरल झाला. त्यानंतर जमावाने या कुटुंबावर पाळत ठेवली. यानंतर सहा लोकांचे कुटुंब ऑटोरिक्षातून प्रवास करताना दिसल्यावर, गावक-यांच्या टोळीने ते दरोडेखोर असल्याचा दावा करत वाहनाचा पाठलाग सुरू केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या