27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयअण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचा निशाणा : केजरीवाल

अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचा निशाणा : केजरीवाल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सरिता विहारमध्ये नवीन रुग्णालय बांधले जात आहे. हे ३३० खाटांचे रुग्णालय आहे, अशी सात रुग्णालये संपूर्ण दिल्लीत बांधली जात आहेत. कोरोनाच्या काळात हे रुग्णालये बांधायला सुरुवात केली आहे. आता कोरोना नाही पण संपूर्ण दिल्लीसाठी हे हॉस्पिटल उपयोगी पडेल. सरिता विहारमधील दिल्ली सरकारच्या नवीन रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ज्या जागेवर रूग्णालय बांधले जात आहे त्या जागेबद्दल २० वर्षांपासून बोलले जात आहे. परंतु आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हे रूग्णालय तयार होईल अशी अपेक्षा आहे. जानेवारीपर्यंत एकूण ६ रुग्णालये तयार होतील.

यावेळी केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लिहिलेल्या पत्रालाही उत्तर दिले. केजरीवाल म्हणाले की, जेव्हा भाजप काही बोलते, मात्र जनता त्यांचे ऐकत नाही, तेव्हा ते कोणाला तरी समोर आणतात. पंजाब निवडणुकीच्यावेळी म्हणाले की अरविंद केजरीवाल हे दहशतवादी आहेत. मग त्यांनी कुमार विश्वास यांना पुढे केले.

आता त्यांनी सांगितले दारू घोटाळा झाला, मग सीबीआय म्हणाली की कोणताही घोटाळा झाला नाही. मग आता अण्णांना पुढं केल्याचं केजरीवाल यांनी म्हटले. तसेच भाजप अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवत असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या