28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयटाटा ग्रुप कोरोना लढ्यात अग्रेसर

टाटा ग्रुप कोरोना लढ्यात अग्रेसर

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुस-या लाटेचा सामना करत आहे. अशातच देशातील टाटा ग्रुप कोरोना लढयात अग्रेसर आहे़ देशातील काही राज्ये सोडल्यास अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. भारतातील प्रमुख उद्योगसमूह टाटा ग्रुपने कोरोना लढ्यासाठी १५०० कोटी रुपयांची मदत केलेली आहे. टाटा ग्रुपच्या कंपन्यांमधून ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे टाटा ग्रुपने क्रायोजेनिक टँकरची आयात देखील केली आहे. टाटा ग्रुपमध्ये काम करणा-या कर्मचा-यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या लढ्यात योगदान देणा-या टाटा ग्रुपला लसीकरण हाच कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्याचा मार्ग आहे, असे वाटत आहे.

टाटा ग्रुपने परदेशातून ६० क्रायोजेनिक टँकर आयात करण्याचा निर्णय घेतल्याची त्यासोबत ४०० ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती टाटा ग्रुपच्या अधिका-याने दिली. याद्वारे निर्माण होणारा ऑक्सिजन छोट्या रुग्णालयांमध्ये वापरला जाऊ शकतो. याशिवाय टाटा ग्रुप कोल्ड स्टोरेजची चैन तायर करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे कोरोना प्रतिबंधक लसींना विशिष्ट तापमानात ठेवता येईल.

वेगवान लसीकरणाची गरज
टाटा सन्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल यांनी जितक्या वेगाने कोरोना लसीकरण करता येईल, तितक्या वेगात ते करावे असे म्हटले आहे. जितके वेगवान लसीकरण होईल तेवढ्या लोकांना सुरक्षित करता येईल. हा सुरक्षित मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी भारत सरकारने जगभरातील कोरोना प्रतिबंधक लसींना परवानगी दिली पाहिजे, असेही बनमाली अग्रवाल यांनी म्हटले आहे. कोरोना लसींसाठी कोल्ड चेनची गरज असते. या दृष्टीने आम्ही तयारी करत आहोत. सुदैवाने आमच्या ग्रुपकडे वोल्टास सारखी कंपनी आहे, असेही बनवाली अग्रवाल म्हणाले.

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या