30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयटाटा स्टील ३०० टन ऑक्सिजन पुरविणार; केंद्र सरकारच्या मदतीला टाटा स्टील...

टाटा स्टील ३०० टन ऑक्सिजन पुरविणार; केंद्र सरकारच्या मदतीला टाटा स्टील धावले

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले असताना आता राज्यात आणि देशात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून उपचारासाठी अत्यावश्यक असणा-या मेडिकल ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. आता केंद्र सरकारच्या मदतीला टाटा स्टील धावले असून २०० ते ३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्ये आणि रुग्णालयांना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू, असे ट्विट टाटा स्टीलने केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली त्यावेळी राज्यात बेड, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले. तसेच, केंद्र सरकारकडे ऑक्सिजन पुरवठ्याची महत्त्वाची मागणी केली होती. रस्तेमार्ग ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सोयीचा नसल्याने हवाई मार्गाने ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली होती.

उद्या राज्यातून ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार; ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या