22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयशिक्षक भरती घोटाळा, कुलगुरूंच्या घरी छापा

शिक्षक भरती घोटाळा, कुलगुरूंच्या घरी छापा

एकमत ऑनलाईन

कोलकाता : केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने शिक्षक भरती घोटाळाची चौकशीसाठी बुधवारी सिलीगुडी उत्तर बंगाल विश्वविद्यालयाचे कुलगुरू सुबिरेस भट्टाचीर्य यांच्या कार्यालयावर वर धाड टाकली. सीबीआयने कोलकातामधील एका बिल्डिंगला सील केले आहे. या घोटाळ््यात ममता बॅनर्जी यांचे विश्वासू असलेले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले माजी मंत्री पार्थ चाटर्जी यांना ईडीने अटक केली आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात भट्टाचार्य यांचे नाव आले होते. अहवालात दावा करण्यात आला आहे की, गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगाल सरकार चालवल्या जाणा-या किंवा अनुदानित संस्थांमध्ये शाळा सेवा आयोगाच्या शिफारशींवर बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. भट्टाचार्य २०१४ ते २०१८ पर्यंत एसएससीचे अध्यक्ष होते.

सीबीआयच्या १२ सदस्यीय पथकाने सिलीगुडी येथील एनबीयू कुलगुरूंच्या कार्यालयावर धाड टाकली. सीबीआयच्या एका अधिका-याने सांगितले की, आम्ही छापे टाकले आणि काही कागदपत्रे आणि त्याचा मोबाईल जप्त केला. दुस-या पथकाने भट्टाचार्य यांचे कोलकात्याच्या बांसड्रोनी भागातील अपार्टमेंट सील केले. मात्र, तो आता सिलीगुडी येथे राहतो. एनबीयूच्या कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या