25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयटेक महिंद्राने शोधले कोरोनावरील औषध!

टेक महिंद्राने शोधले कोरोनावरील औषध!

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोनामुळे त्रस्त असलेल्या सगळ््यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आयटी क्षेत्रातील आघाडीची टेक महिंद्रा आणि रेजीन बायो सायन्स यांनी एकत्र येत कोरोनावरील औषध शोधून काढले आहे. मार्कर्स लॅब टेकने रीगेन बायो सायन्ससोबत करोना व्हायरसवर गुणकारी ठरणा-या करणा-या एका रेणूचा म्हणजेच औषधाचा शोध लावला आहे. मार्कर्स लॅब टेक ही महिंद्राची संशोधन करणारी कंपनी आहे. टेक महिन्द्राचे जागतिक प्रमुख असणा-या निखिल मल्होत्रा यांनी या मॉलिक्यूलच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. त्यानंतर याची चाचणी करण्यात येणार आहे.

टेक महिंद्रा आणि रेजीन बायो सायन्स यावर संशोधन करत आहेत. मार्कर्स लॅबने कोरोना विषाणूचे संगणकीय विश्लेषण सुरू केले आहे. त्या आधारे, टेक महिंद्रा आणि रेजीन बायो सायन्स यांनी एफडीएने मान्यता दिलेल्या ८००० औषधांपैकी १० औषधांच्या मॉलिक्यूलच्या निवड केली आहे. १० औषधांच्या मॉलिक्यूलपैकी ३ औषधांची निवड केली आहे. त्यानंतर एका थ्रीडी फुफ्फुसावर या औषधांची चाचणी करण्यात आली. तीनपैकी एक औषध परिणामकारक असल्याचे मार्कर्स लॅबने सांगितले आहे. त्या औषधावर टेक महिंद्राने संगणकीय आणि रेजीन बायो सायन्सने वैद्यकीय विश्लेषण केले आहे. मल्होत्रा यांच्या म्हणण्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी वेळेत औषधे शोधता येतील.

प्राण्यावर करणार चाचणी
या औषधाची प्राण्यांवर चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर अभ्यास करण्याचीदेखील आवश्यकता असणार आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे की, या तंत्रामुळे औषधांच्या शोधासाठी कमी वेळ लागेल. आम्ही त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी अधिक अभ्यास करीत आहोत. जगभरात ब-याच औषधांवर चाचण्या सुरू आहेत. लोक प्राणघातक अशा करोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी फक्त लसीवर अवलंबून आहेत असे मल्होत्रा यांनी सांगितले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या