24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीय'निर्भय’ चाचणीदरम्यान तांत्रिक बिघाड

‘निर्भय’ चाचणीदरम्यान तांत्रिक बिघाड

एकमत ऑनलाईन

चंदनपूर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने सोमवारी ओडिशाच्या परीक्षण तळावरुन बंगालच्या उपसागरात ८०० किलोमीटर रेंज असलेले ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्र डागले. पण काही मिनिटातच चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षण तळावरुन सकाळी १०.३० च्या सुमारास क्षेपणास्त्र डागण्यात आले़ पण क्षेपणास्त्रात तांत्रिक बिघाड उदभवल्याने आठ मिनिटात चाचणी रद्द करण्यात आली, असे सरकारी अधिका-याने सांगितले.

निर्भय हे मागच्या ३५ दिवसांत डीआरडीओने डागलेले १० वे क्षेपणास्त्र आहे. सरासरी दर चार दिवसांनी क्षेपणास्त्र चाचणी सुरु आहे. पूर्व लडाख सीमेवर चीनने केलेली सैन्याची जमवाजमव आणि क्षेपणास्त्र तैनातीच्या पार्श्वभूमीवर भारताने नव्या पीढिच्या क्षेपणास्त्र विकासाच्या आणि तैनातीच्या कार्यक्रमाला गती दिली आहे. त्यामुळेच डीआरडीओकडून सतत क्षेपणास्त्र चाचण्या सुरु आहेत.

या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, पुढच्या काही महिन्यात डीआरडीओ पुन्हा चाचणी करेल, त्यामुळे या क्षेपणास्त्राचा भारतीय लष्करात समावेशाचा मार्ग मोकळा होईल. सोमवारी निर्भय क्षेपणास्त्राची आठव्या फेरीची चाचणी करण्याआधी मर्यादीत प्रमाणत ही क्षेपणास्त्रे चीनला लागून असलेल्या सीमेवर पाठवण्यात आली आहेत.

पाच दिवसांत १० दशतवाद्यांचा खात्मा; एका दहशतवाद्याचे आत्मसमर्पण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या