30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयरोटी बँक चालवणारे किशोरकांत कालवश

रोटी बँक चालवणारे किशोरकांत कालवश

एकमत ऑनलाईन

वाराणसी : रोटी बँक सुरू करून गरीबांचे पोट भरणारे सामाजिक कार्यकर्ते किशोरकांत तिवारी यांचे गुरूवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना रविंद्र्रपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

किशोरकांत तिवारी हे मूळ बिहारमधील सासाराममचे रहिवासी होते. परंतु ते लंका सामनेघाट येथील महेश नगर कॉलनीमध्ये राहत होते. २०१७ मध्ये वाराणसीमध्ये त्यांनी रोटी बँक सुरू करून गरीबाचे पोट भरणे सुरू केले.

आपल्या सहका-यांसह शहरातील लग्न कार्यात किंवा अन्य कोणत्या कार्यांमध्ये उरलेले अन्य जमा करून शहरातील निरनिराळ्या भागात गरीबांना वाटत होते. काशीमध्ये कोणीही उपाशी राहू नये असा विचार करत त्यांनी लोकांच्या मदतीने ताजे जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरही सुरू केले होते़

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या