18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयतेजस्वी यादव हेच लालूं उत्तराधिकारी

तेजस्वी यादव हेच लालूं उत्तराधिकारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी रविवारी पक्षाच्या उत्तराधिका-याची घोषणा केली. माझ्यानंतर तेजस्वी यादव यांनाच पक्षात सर्वाधिकार असतील. पक्षाशी निगडीत महत्त्वाचे निर्णय आणि धोरणात्मक विषयांवर तेच बोलतील, असे त्यांनी जाहिर केले.

आरजेडीच्यावतीने रविवारपासून राजधानी नवी दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बोलावण्यात आली आहे. तीत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त जात होती. तेजस्वी यादव यांना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दिला होता.
दरम्यान रविवारी बैठकीच्या पहिल्या दिवशी राजदचे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम रंजक यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करत एक मंत्री आणि लालू यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप संतापून बैठक सोडून निघून गेले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या