26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयतेलंगणा सरकार १७ सप्टेंबर रोजी साजरा करणार राष्ट्रीय एकात्मता दिवस

तेलंगणा सरकार १७ सप्टेंबर रोजी साजरा करणार राष्ट्रीय एकात्मता दिवस

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : तेलंगणा सरकारने १७ सप्टेंबर हा तेलंगणा राष्ट्रीय एकात्मता दिवस ​​म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ सप्टेंबर हा १९४८ मध्ये निजामाच्या राजवटीत हैदराबाद राज्याच्या भारतीय संघराज्यात विलीन झाल्याचा दिवस आहे.

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात म्हटले की सरकार १६ सप्टेंबरपासून तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करेल. १७ सप्टेंबर रोजी, मुख्यमंत्री सार्वजनिक उद्यानात राष्ट्रध्वज फडकावतील आणि लोकांना संबोधित करतील, तर मंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी आपापल्या जिल्ह्यात तेच करतील.

शहरात एक मोठी रॅली काढण्यात येणार असून त्यानंतर केसीआर जाहीर सभेला संबोधित करतील. १७ सप्टेंबर रोजी सर्व जिल्हा मुख्यालयावर राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्याबरोबरच कवी, कलाकार व इतर व्यक्तिमत्त्वांचाही गौरव करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दलित बंधू योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या १०० वरून ५०० करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या