25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयएअर इंडियाच्या विक्रीच्या हालचाली केंद्राने मागविल्या निविदा, प्रक्रियेला वेग

एअर इंडियाच्या विक्रीच्या हालचाली केंद्राने मागविल्या निविदा, प्रक्रियेला वेग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एअर इंडियाच्या विक्रीसाठी नव्याने निविदा मागवल्या आहेत. यासाठी सरकारने एक निवेदन जारी केले आहे. एअर इंडिया विक्रीसाठी शेअर खरेदी करार इच्छुक संस्थांशी शेअर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. एअर इंडियाच्या खरेदीमध्ये रस असणा-­या कंपन्यांना व्हर्च्युअल डेटा रूमचा अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एअर इंडिया कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. त्यामुळे सरकार ही विमान कंपनी बंद करण्याच्या प्रयत्नात आहे.

एअर इंडियाच्या खरेदीसाठी निवडलेल्या संस्थांना आर्थिक निविदा देण्यासाठी जून किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंतची मुदत दिली जाऊ शकते. त्याचबरोबर बोली बंद झाल्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत एअर इंडियाच्या खरेदीच्या आर्थिक प्रस्तावाचे मूल्यांकन केले जाऊ शकते. त्यामुळे एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सप्टेंबरनंतर पूर्ण होणे अपेक्षित आहे. एअर इंडियाच्या व्यावसायिक संचालिका मीनाक्षी मल्लिक यांनी आपल्या नेतृत्वात एका टीमद्वारे एअर इंडिया खरेदी करण्याबाबत बोली लावली होती. पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. पण सरकार केवळ एअर इंडियाच नव्हे, तर एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ५० टक्के भाग विक्री करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करत असल्याची माहितीही समोर आली आहे.

कंपनीवर ६० हजार कोटी रुपयांचे थकित कर्ज
एअर इंडियामधील ११ टक्के भागभांडवल विक्री करणार असल्याचे सरकारने याआधीच स्पष्ट केले आहे. या कंपनीवर आतापर्यंत ६० हजार कोटी रुपयांचे थकित कर्ज आहे. २००७ साली एअर इंडियामध्ये इंडियन एअरलाईन्सचे विलीनीकरण झाल्यापासून ही कंपनी तोट्यात आली आहे. तेव्हापासून या विमान कंपनीला उभारी घेता आली नाही.

कवलदरा येथील उड्डाणपुलाखाली अनोळखी प्रेत आढळल्याने खळबळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या