24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeराष्ट्रीयभारत आणि चीन यांच्यात तणाव वाढला : मदतीसाठी सरसावले भारताचे मित्रराष्ट्र

भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढला : मदतीसाठी सरसावले भारताचे मित्रराष्ट्र

एकमत ऑनलाईन

भारत-चीन तणाव, अमेरिकेकडून आर्टिलरी, रशियाकडून दारूगोळा, फ्रान्सकडून राफेल मिळणार

नवी दिल्ली : लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढला आहे. अशातच भारताचे मित्र राष्ट्र करार झालेले शस्त्र वेळेच्या अगोदर देण्यासाठी तयार आहेत. फ्रान्सने आणखी एक राफेल लढाऊ विमान पुढच्या महिन्यात देण्याचे आश्वासन दिले आहे, तर इस्रायलची सेवेत असलेली हवाई संरक्षण प्रणाली लवकरच मिळणे अपेक्षित आहे. अमेरिकेकडून आर्टिलरी पाठवली जाणार आहे, तर रशिया दारुगोळा आणि जवळपास ७ हजार ५०० कोटी रुपयांची शस्त्रे पाठवणार आहे. दिल्लीत उच्चस्तरीय बैठका आणि द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर ही आश्वासने मिळाली आहेत.

कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्याला आर्थिक ताकदही प्रदान करण्यात आली आहे. एअर टू एअर हल्ल्यासाठी जगातील सर्वात शक्तीशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या राफेलची पहिली खेप भारताला २७ जुलैपर्यंत मिळणार आहे. रहरियाणाच्या अंबाला एअर बेसवर राफेलची पहिली तुकडी तैनात होईल. प्राथमिक माहितीनुसार फ्रान्सच्या इस्ट्रेसवरून चार ते सहा राफेल विमाने भारतात दाखल होतील. राफेल विमान भारतीय वायू सेनेच्या वैमानिकांद्वारेच आणली जातील. या वैमानिकांना फ्रान्समध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. अंबालामध्ये पोहोचणारे हे सर्व विमाने युद्धासाठी सज्ज अशा परिस्थितीतच येणार आहेत.

​इस्रायलही करणार भारताची मदत

दुसरीकडे इस्रायलही भारताचा महत्त्वाचा भागीदार देश आहे. कारगील युद्धातही इस्रायलने प्रतिबद्धता दाखवून दिली होती. इस्रायलकडून भारतासाठी अत्यावश्यक असलेली हवाई संरक्षण प्रणाली दिली जाणार आहे. कोणतेही नाव नसलेली ही प्रणाली सध्या इस्रायल हवाई सेनेच्या सेवेत असून तातडीने भारतात आणली जाईल आणि लडाखमध्ये तैनात केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

​रशिया देणार अत्याधुनिक शस्त्र

भारताचा सर्वात मोठा संरक्षण शस्त्र पुरवठादार देश रशियाही शस्त्र, दारुगोळा आणि क्षेपणास्त्र देण्यासाठी सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी नुकतीच याबाबतची विनंती केली होती. भारताकडून आवश्यक असलेल्या गरजांची यादी रशियाला पाठवली जाणार आहे, ज्याची किंमत जवळपास ७ हजार ५०० कोटी रुपये आहे. काही आठवड्यातच भारताची ही गरज पूर्ण होणार आहे.जमीनीवरुन लढाई करणारे रणगाडे आणि इतर शस्त्र हे रशियन बनावटीचे आहेत. तसेच भारतीय वायूसेनेला तातडीने एअर ड्रॉप बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांची, तर भारतीय सैन्याला अँटी टँक मिसाईल, मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टमची सीमेवर गरज आहे. त्याचाही लवकरच पुरवठा होऊ शकतो.

​अमेरिकाही करणार भारताची मदत

भारताचा अलीकडच्या काळातील महत्त्वाचा मित्र देश अमेरिकाही या काळात भारताची मदत करणार आहे. अमेरिकेकडून अगोदरच गुप्तचर माहिती आणि सॅटेलाईट फोटोंद्वारे भारताची मदत केली जात आहे. लवकर पाहिजे असलेल्या सर्व गरजांची यादी भारताने द्यावी, असे अमेरिकेने म्हटले आहे. याशिवाय, अतिरिक्त तोफखानाही तातडीने मागवण्यात आला आहे. एम ७७७ सारख्या आर्टिलरीमध्ये ४० किमीपर्यंतचा अचूक निशाणा साधणाºया दारुगोळ््याचा वापर केला जातो, ज्याची रचनाच डोंगर भागातील युद्धासाठी करण्यात आलेली आहे. ते भारताला मिळणार आहे.

Read More  उर्जा देणारी लोहयुक्त ‘आबई’

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या