24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयकरोल बागेत भीषण आग

करोल बागेत भीषण आग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतल्या करोल बाग परिसरातल्या गफर मार्केटमध्ये आज सकाळी भीषण आग लागली.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत कोणाचाही मृत्यू झालेला नाही किंवा कोणालाही इजा झालेली नाही. मात्र अग्निशमन दलाच्या एका जवानाला किरकोळ जखम झालेली आहे. अद्याप आग लागल्याचे कारण समोर आलेले नाही.

गफर मार्केट इथल्या चप्पल बाजारात ही आग लागली.

सकाळी सव्वाचार वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या ३९ गाड्या ही आग विझविण्यासाठी पाठवण्यात आल्या. आता ही आग नियंत्रणात आली असून या आगीच्या ज्वाळा दुस-या मजल्यापर्यंत पोहोतल्या होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या