36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयपुलवामा मध्ये पंपोर बायपासजवळ दहशतवादी हल्ला; 2 सीआरपीएफ जवान शहीद

पुलवामा मध्ये पंपोर बायपासजवळ दहशतवादी हल्ला; 2 सीआरपीएफ जवान शहीद

एकमत ऑनलाईन

जम्मू कश्मीर मध्ये पंपोर बायापास जवळ भारताच्या सीआरपीएफ जवानांवर आज पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आहे. दरम्यान या हल्ल्यामध्ये 5 जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याने ते शहीद झाले आहेत तर अन्य 3 जणांवर नजिकच्या रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रोड ओपनिंग पार्टीजवळ सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार आज दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास हा दहशतवादी हल्ला झाला आहे. जखमी सीआरपीएफ जवानांना तात्काळ नजीकच्या जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सीआरपीएफ जवानांसोबतच जम्मू कश्मीर पोलिस पंपोर मध्ये कांडिझल ब्रिजवर रोड ओपनिंग़ ड्युटी करत होते तेव्हा हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर तात्काळ सारा परिसर बंद करण्यात आला आहे. तर हल्लेखोर दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे.

हाथरस प्रकरणी योगींचा विरोधकांवर जोरदार पलटवार

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या