23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयतिहार जेलमध्ये दहशतवादी यासीन मलिकचे उपोषण

तिहार जेलमध्ये दहशतवादी यासीन मलिकचे उपोषण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद असलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिक तुरुंगातच उपोषणाला बसला आहे. दहशतवादी यासीन मलिकचे म्हणणे आहे की, त्याच्या विचाराधीन असलेल्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू नाही, त्यामुळेच त्याने तुरुंगातच उपोषण सुरु केले आहे. यासीन मलिक याच्याशी बोलण्यासाठी तुरुंगातील वरिष्ठ अधिकारीही आले, मात्र त्याने उपोषण सोडण्यास नकार दिला.

यापूर्वी १३ जुलै रोजी, मलिकने माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्या अपहरणाशी संबंधित प्रकरणातील साक्षीदारांची उलटतपासणी करण्यासाठी दिल्लीतील विशेष न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी न मिळाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचे मलिकने सांगितले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या