25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeक्राइमकोठडीतून पळालेल्या आरोपीने भरली उमेदवारी

कोठडीतून पळालेल्या आरोपीने भरली उमेदवारी

एकमत ऑनलाईन

हिसार : पोलिसांच्या हातावर तुरी देत कोठडीतून पळालेल्या एका आरोपीने चक्क हरियाणाच्या पंचायत निवडणुकीत रेवाडी जिह्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ही उमेदवारी दाखल केली. कोसली ठाणे पोलिसांना १४ दिवसांपूर्वी चकवा देत या आरोपीने रेवाडी जिह्यातून पळ काढला होता. त्याने या आधी बिहार पोलिसांच्या कोठडीतूनही पळ काढला होता.

त्यामुळे बिहार पोलिस २०१७ पासून त्याचा शोध घेत आहेत. जीवन हितैशी उर्फ लाला असे या फरार आरोपीचे नाव आहे. लालावर ७ फौजदारी गुन्हे दाखल आहेत. बिहारच्या जिल्हा गोपालगंजच्या कुचायकोट ठाण्यात २६ ऑक्टोबर २०१७ ला त्याच्यावर अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या