24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयविरोधकांकडून शेतक-यांना भडकवण्याचे काम

विरोधकांकडून शेतक-यांना भडकवण्याचे काम

नरेंद्र मोदी ; कृषि कायद्यांचे पुन्हा केले समर्थन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गुजरात दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा कृषि कायद्यांचे समर्थन केले आहे. गुजरातच्या कच्छ येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कृषि कायद्यांवरुन शेतक-यांना भडकवण्याचे काम विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोप केला आहे. कृषि कायद्यांबाबतच्या शेतक-यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

कच्छमध्ये आज जगातील सर्वात मोठा हायब्रिड एनर्जी पार्कचे भुमीपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. योवळी मोदी बोलत होते. तुमच्याजवळ जर कुणी दुधासाठीचा करार करत असेल तर तो तुमच्या गायी घेऊन जातो का?, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. ज्या पद्धतीने पशूपालन व्यवसायात शेतक-यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याच पद्धतीने शेतीमध्येही आता स्वातंत्र्य येणार आहे, असे मोदी म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना या कायद्यासाठीची मागणी करत होते आणि आज ती पुर्ण केल्यानंतर विरोधक शेतक-यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. शेतक-यांचे हित ही सरकारची प्राथमिकता असून त्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतक-यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. देशाच्या कानाकोप-यातील शेतकरी सरकारसोबत आहे. काहीजण गैरसमज निर्माण करुन शेतक-यांच्या डोळयात धूळ फेकण्याचे काम करत आहेत. शेतक-यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण केले जातेय, असा आरोप मोदींनी केला.

कच्छला मोदींची मोठी भेट
सरदार वल्लभभाई पटेल यांचें स्वप्न आज पूर्ण होत आहे. कच्छ हा जगातील सर्वात मोठा हायब्रिड एनर्जी पार्क बनणार आहे. सिंगापूर आणि बहारिनमध्ये ज्यापद्धतीने एनर्जी पार्क आहे. त्या तोडीचा हायब्रिड एनर्जी पार्क कच्छमध्ये तयार होतोय, असे मोदींनी सांगितलं. प्रकल्पामुळे स्थानिक शेतक-यांनाच फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले.

आरोग्‍य विभागातील ५० टक्‍के पदे एक महिन्यात भरणार ! -राजेश टोपे यांची घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या