31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयलष्कराने पाकचा डाव उधळला

लष्कराने पाकचा डाव उधळला

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : पाकिस्तानी दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्र तस्करी करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून हे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांकडून चार एके-४७, आठ मॅगझिन्स आणि २४० एके रायफल जप्त केल्या आहेत.

लष्कराला केरन सेक्टरमध्ये किशन गंगा नदी पात्रात काही हालचाली सुरु असल्याचे दिसले होते़ यानंतर लगेचच जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम सुरु करण्यात आली. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दहशतवादी दोरीच्या सहाय्याने ट्यूबमधून नदीपलीकडे नेत असल्याचे लक्षात आले. यानंतर तात्काळ कारवाई करत शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

यावर्षी मोठ्या प्रमाणात घुसखोरी रोखण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले आहे. गेल्यावर्षी १३० वेळा प्रयत्न झाला होता, यावेळी ही संख्या ३० ने कमी झाली आहे. यामुळे देशांतर्गत परिस्थिती सुधारण्यास मदत मिळेल, असा विश्वास लेफ्टनंट जनरल बी एस राजू यांनी व्यक्त केला आहे.

कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले की, आमच्या सतर्क जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पाकिस्तानचा हेतू अद्यापही बदललेला नाही हे स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत त्यांचा हेतू कायम आहे तोपर्यंत आम्ही लढा देत राहू, असे ते म्हणाले आहे.

लॉँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी
गुप्तचर यंत्रणांनुसार, पाकिस्तानमध्ये लॉँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी आहेत. वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करुनही त्यांना रोखण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

संयमाची परीक्षा न घेता न्याय द्या, यापुढे संयमी नसणार – छत्रपती संभाजीराजे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या