21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयलष्कराला मिळणार स्वदेशी घातक रायफल

लष्कराला मिळणार स्वदेशी घातक रायफल

डिआरडिओची निर्मिती ; ५.५६ ७ ३० मिमी प्रोेटेक्टिव कार्बाइन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्­ली : देशाच्या सीमांवर शत्रुला कंठस्रान घालण्यासाठी सज्ज असलेल्या लष्कराच्या जवानांना आता स्वदेशी घातक रायफल मिळणार आहेत. डिआरडिओने बनविलेल्या ५.५६ ७ ३० मिमी प्रोेटेक्टिव कार्बाइन या रायफलच्या कार्यक्षमतेवर संरक्षण मंत्रालयाने अनुकूलतेची मोहोर उमटवली असून आता त्यांना लष्करात सामील करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डिआरडिओने बनविलेल्या या ५.५६ ७ ७३० मिमी प्रोेटेक्टिव कार्बाइन रायफलचे परीक्षण ७ डिसेंबरला करण्यात आले. यावेळी सर्व मापदंडांवर या रायफलने उत्कृष्ठ कामगिरी केली. अतिशय उच्च तापमान व उच्च थंडी अशा दोन्ही प्रकारच्या टोकाच्या विषम हवामानातही ही रायफल कोणताही बिघाड न होता आपले काम करु शकते. त्यामुळेच या रायफलला सेवेत सामील करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

वजनाने हलकी असल्याने वापरास सुलभ
वजनाला अत्यंत हलकी, गोळी झाडल्यानंतर बसणारा कमी धक्का,एका मिनिटात ७०० गोळ्या झाडण्याची क्षमता आदी अनेक वैशिष्ट्यपुर्ण रचनांमुळे जवानांना हाताळण्यासाठी अत्यंत सुलभ अशी ही रायफल आहे. रायफलच्या समावेशामुळे सीमेतून घुसखोरी करु पाहणा-या दहशतवाद्यांवर त्वरेने व अचूक हल्ला करता येणार आहे. तसेच शत्रुच्या प्रदेशात घुसून सर्जिकल स्ट्राईकसारख्या कारवाया करण्यासाठीही ही रायफल सुलभ ठरणार आहे.

रायफलची वैशिष्टये :
-गॅस ऑपरेटेड सेमीबुलपप ऑटोमेटिक रायफल
-वजन केवळ ३ किलो असल्याने हाताळण्यास एकदम सोयीस्कर
-१०० मीटरपेक्षा अधिक लांबीवरील लक्ष्यही साधता येते.
-बट मागे घेण्याची सुविधा व फायरिंगनंतर बसणारा कमी धक्का
-एका हातानेही चालविता येते.

जलयुक्त च्या दोषींवर कारवाई होणारच – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या