24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलोकशाही भारत-अमेरिका नात्याचा आधार

लोकशाही भारत-अमेरिका नात्याचा आधार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अमेरिका आणि भारत लोकशाही मूल्यांबाबतीत प्रतिबद्ध आहेत; हा आमच्या दोघांच्याही संबंधांचा मुख्य भाग आहे आणि भारताच्या बहुलवादी समाज आणि एकोप्याच्या इतिहासाला प्रतिबिंबीत करतो. नागरी समाज देखील या मूल्यांना उन्नत करण्यास मदत करतो, असे प्रतिपादन भारत दौºयावर असलेल्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी केले आहे़

जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे नवीन परराष्ट्र मंत्री एंटनी ब्ल्ािंकन भारत दौºयावर आले आहेत. हा दौरा अनेक बाबतीत खास आहे. एंटनी ब्लिंकन यांनी आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली तसेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना भेटले आहेत. त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही भेट होणार आहे. दक्षिण आशियातील सद्यस्थितीचा विचार करता अमेरिकन परराष्ट्रमंत्री अ‍ँथनी जे. ब्लिंकन यांचा दोन दिवसीय भारतदौरा अतिशय महत्त्वाचा ठरेल, असे मानले जात आहे़

भारताच्या या दौ-याबाबत बोलताना अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, ब्लिंकन कोरोनाच्या लढाईमध्ये एकत्र काम करणे, हिंदी-पॅसिफीक महासागर, पर्यावरण बदल तसेच इतर लोकशाही मुल्यांबाबतही चर्चा करतील. बुधवारी सकाळी ब्लिंकन यांनी नवी दिल्लीतील नागरी समाजातील नेत्यांना संबोधित करून आपल्या भेटीची अधिकृत सुरुवात केली.

काश्मिरात ढगफुटी; ४ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या