26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयभीम आर्मीचा पीएफआयशी संबंध नाही

भीम आर्मीचा पीएफआयशी संबंध नाही

एकमत ऑनलाईन

लखनौ : हाथरस प्रकरणाचा तपास करणा-या संस्थांना १०० कोटी रुपयांच्या विदेश फंडिगशी संबंधित माहिती मिळाली आहे. त्याबाबत अनेक दावे केले जात असून पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया (पीएफआय) आणि भीम आर्मी यांचे संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, भीम आर्मीचा पीएफआयशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा सक्तवसुली संचालनालयाने (इडी) केला आहे. उत्तर प्रदेशात जातीय दंगल पसरवण्यासाठी १०० कोटी रुपयांचे विदेश फंडिंग करण्यात आले होते असे एसआयटीला तपासादरम्यान आढळले होते. या नंतर या प्रकरणात पीएफआयचा संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

विदेशी फंडिंगचे १०० कोटी आढळले नाहीत
तपासानंतर विदेशातून आलेले १०० कोटी रुपये आढळल्याचा दावा देखील चुकीचा असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे. काही संघटना हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची दिशाभूल करत आहेत, असा दावा उत्तर प्रदेशचे माजी पोलिस महासंचालक बृजलाल यांनी केल्यानंतर ईडीने हे स्पष्टीकरण दिले आहे.

शांततेचे नोबेल वर्ल्ड फूड प्रोग्राम ला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या