24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीय१९८४ च्या ऑपरेशन मेघदूतमध्ये शहिद झालेल्या जवानाचा ३८ वर्षांनंतर सापडला मृतदेह

१९८४ च्या ऑपरेशन मेघदूतमध्ये शहिद झालेल्या जवानाचा ३८ वर्षांनंतर सापडला मृतदेह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलनात शहिद झालेल्या लान्सनायक चंद्रशेखर हरबोला या जवानाचा मृतदेह तब्बल ३८ वर्षांनंतर सापडला आहे. मृतदेह सापडल्याच्या बातमीने कुटुंबीयांच्या जखमा पुन्हा एकदा भावनीक झाल्या आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद जवानाचे पार्थिव मंगळवारी हल्द्वानीला त्याच्या मुळ गावी पोहोचण्याची शक्यता आहे.

सियाचीन ग्लेशियरच्या मधोमध हिमस्खलन झाल्या नंतर लांसनायक चंद्रशेखर हरबोला यांचा मृत्युदेह तबल ३८ वर्षांनी सापडला आहे.शहीद जवानाचे शहीद मंगळवारी हळदवाणीला पोहोचन्याची शक्यता आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला, मूळचे उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील रानीखेत तहसील अंतर्गत असलेल्या बिंता हाथीखुर गावचे रहिवासी असून १९७१ मध्ये कुमाऊं रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. मे १९८४ मध्ये, बटालियन लीडर लेफ्टनंट पीएस पुंडिर यांच्या नेतृत्वाखाली १९ सैनिकांची टीम ऑपरेशन मेघदूतसाठी निघाली.

२९ मे रोजी संपूर्ण बटालियनची एका मोठ्या हिमस्खलनात गाडली गेली, शोधल्या नंतर सापडले नसल्याने त्याला शहिद घोषित करण्यात आले. त्यावेळी लान्स नाईक चंद्रशेखर यांचे वय २८ वर्षे होते. शनिवारी रात्री शहीदाच्या पत्नी शांती देवी यांना फोनवरून माहिती मिळाली की, शहीद लान्स नाईक चंद्रशेखर यांचा मृतदेह हिमनदीतून सापडला आहे.

माहिती मिळताच एसडीएम मनीष कुमार सिंह आणि तहसीलदार संजय कुमार यांच्यासह प्रशासनाचे पथक रविवारी दहरियाच्या रामपूर रोडवरील सरस्वती विहारमधील त्यांच्या घरी पोहोचले. शोक व्यक्त करत एसडीएमने कुटुंबीयांचे सांत्वन केले. सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी पुष्कर भंडारी यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार शहीद जवानाचे पार्थिव सोमवारी संध्याकाळपर्यंत हल्द्वानीला पोहोचणे अपेक्षित आहे. राणीबाग येथील चित्रशिला घाटावर शहिदांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. अंत्यसंस्काराची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या