23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयबॉम्बस्फोटाचा कट उधळला

बॉम्बस्फोटाचा कट उधळला

एकमत ऑनलाईन

आझमगड : उत्तर प्रदेश एटीएसच्या टीमने मंगळवारी १५ ऑगस्टला बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावत आझमगडमधून आयएसआयएसच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. सबाउद्दीन आझमी असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याच्याकडून आयईडी बनवण्याचे साहित्य, अवैध शस्त्रे आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तो आयएसआयएसमध्ये भर्ती करणा-या व्यक्तीच्या थेट संपर्कात होता, असे सांगण्यात येत आहे.

आझमगडमधील अमिलो मुबारकपूर येथील व्यक्ती आयएसआयएसच्या विचारसरणीने प्रभावित होऊन व्हॉट्सअ‍ॅप आणि विविध सोशल मीडिया अप्लिकेशन्सद्वारे जिहादी विचारसरणीचा प्रसार करीत आहे. इतरांनाही आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करीत आहे अशी माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती.

या दहशतवाद्याला अटक करून एटीएसच्या मुख्यालयात चौकशीसाठी आणले. चौकशी आणि मोबाइल डेटाच्या आधारे तो दहशतवाद व जिहादसाठी मुस्लिम तरुणांचे ब्रेनवॉश करण्यासाठी आयएसआयएसने तयार केलेल्या टेलिग्राम चॅनलशी त्याचा संबंध असल्याचे पुरावे सापडले आहेत. सध्या ते अकटकट चा सदस्य आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या