27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयबीटीपीने गेहलोत सरकारचा पाठिंबा काढला

बीटीपीने गेहलोत सरकारचा पाठिंबा काढला

राजकीय घडामोडींना वेग; गेहलोत सरकार तूर्तास सुरक्षित

एकमत ऑनलाईन

जयपूर : राजस्थानात अशोक गेहलोत सरकारसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. भारतीय ट्रायबल पक्षाच्या (बीटीपी) दोन आमदारांनी काँग्रेसच्या गेहलोत सरकारला दिलेला पाठिंबा काढला आहे. या आमदारांचा गेहलोत सरकारला पाठिंबा होता. या वर्षाच्या सुरुवातीला गेहलोत सरकारने विधासभेत बहुमत सिद्ध केले, त्यावेळी या दोन आमदारांनी गेहलोत यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता त्यांनी सरकारचा पाठिंबा काढल्याने राजस्थानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

काँग्रेसवर नाराज असल्याने राजकुमार रोत आणि रामप्रसाद यांनी पक्षाचे अध्यक्ष महेश वसावा यांना काँग्रेसचा पाठिंबा काढण्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी गेहलोत सरकारचा पाठिंबा काढला आहे. पायलट यांच्या बंडाच्यावेळी आणि राज्यसभेच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर काँग्रेसशी संबंध तोडण्याची वेळ आल्याचे या दोन आमदरांनी सांगितले. राज्यात नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आपल्याला मदत केली नसल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. आम्हाला मदत न करता काँग्रेसने धोका दिल्याने सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने १८३३ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला १७१३ जागा जिकंत्या आल्या आहेत. तसेच जिल्हाप्रमुखांच्या निवडणुकीतही भाजपने काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. राजस्थानातील डूंगरपूर जनपदमध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडणुकीत बीटीपीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी केल्याने बीटीपीचा जिल्हा प्रमुख झाला नाही. त्यामुळे काँग्रेसने मदत केली नसल्याचे बीटीपीचे म्हणणे आहे.

दोन आमदारांनी पाठिंबा काढल्याने काँग्रेसकडे बहुमत असले तरी काँग्रेससमोरील संकट वाढले आहे. विधानसभेच्या काही जागांवर पोटनिवडणूक होणार आहेत. राजस्थानात एकूण २०० विधानसभेच्या जागा आहेत. आता गेहलोत सरकारकडे ११८ आमदार आहेत. त्यात काही अपक्ष आमदारांचाही समावेश आहे.

गेहलोत यांनी दिला होता इशारा
राज्यात पुन्हा सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे काही दिवसांपूर्वीच गेहलोत यांनी सांगितले होते. राजस्थानात सरकारस्थापनेसाठी भाजप प्रयत्न करत असून आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती. त्यावेळी सचिन पायलट यांनी वेगळा गट स्थापन केला होता. त्यानंतर पायलट पक्षात परतले होते आणि सरकारसमोरील संकट टळले होते. आता पुन्हा बीटीपीच्या दोन आमदारांनी पाठिंबा काढल्याने सरकारसमोर संकट उभे ठाकले आहे.

आयसीसीची एकदिवसीय क्रमवारी जाहीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या