28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयउद्योगपती करतो छळ, पत्नीचा आरोप

उद्योगपती करतो छळ, पत्नीचा आरोप

एकमत ऑनलाईन

भोपाळ : देशातील बड्या औद्योगिक घराण्यातल्या डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपच्या मालकावरच पत्नीने अमानूष मारहाण आणि छळाची तक्रार दाखल केल्याने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील उद्योग वर्तूळात सोमवारी खळबळ उडाली. अजय हरिनाथ सिंह असे या उद्योगपतीचे नाव आहे. छळाची तक्रार दाखल करणारी त्यांची पत्नी अमृता या सध्या भोपाळच्या नर्मदा ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी भरती आहे.

त्यांना ३ नोव्हेंबर ला मारहाण झाल्यानंतर येथे दाखल करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री त्यांना शुद्ध आल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या बयाणात त्यांनी ही माहिती दिली. पती अजयच्या निर्दयी मारहाणीमुळेच पायाचे हाड मोडले, डोक्याला गंभीर दुखापत झाली, शरीराव जखमा आहेत, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. अजय हे अमृताला मारहाण करीत मुलांना घेऊन मुंबईला निघून गेले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या