21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयसीएएमुळे मुस्लिमांचे कोणतेही नुकसान होणार नाही

सीएएमुळे मुस्लिमांचे कोणतेही नुकसान होणार नाही

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : देशात कोरोनाची लाट येण्यापूर्वी दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात मोठे आंदोलन सुरू होते. कोरोनाची लाट सुरू झाली आणि हे आंदोलन आणि त्यापाठोपाठ सीएए-एनआरसीचा मुद्दा देखील मागे पडला. मात्र, आता पुन्हा एकदा त्या मुद्यांवरून नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सीएएविषयी एका कार्यक्रमात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली असून देशातील मुस्लिमांचे सीएए अर्थात नागरिकत्व कायद्यामुळे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे स्पष्टीकरण बुधवार दि़ २१ जुलै रोजी भागवत यांनी दिले़

याच विषयावरील एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी गुवाहाटीमध्ये मोहन भागवत बोलत होते. यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी सीएएमुळे देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण मिळेल, असेदेखील नमूद केले आहे़ स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की देशातील अल्पसंख्याकांची काळजी घेतली जईल. ते अजूनही केले जात आहे. आपण यापुढेही ते करतच राहू. यासंदर्भात आपण इतर देशांमध्ये असलेल्या बहुसंख्यकांशी देखील चर्चा केली. यापैकी कुणाला जर धोका किंवा भीतीमुळे भारतात यायची इच्छा असेल, तर आपण नक्कीच त्यांना मदत करायला हवी, असेदेखील भागवत म्हणाले आहेत.

सीएए, एनआरसी भोवतीचा वाद राजकीय
सरसंघचालक मोहन भागवत यांनी सीएए आणि एनआरसीसंदर्भात सुरू असलेला वाद राजकीय फायद्यापोटी घातला जात असल्याचे यावेळी बोलताना म्हटले आहे. सीएए आणि एनआरसी दोन्ही कायद्यांचा हिंदू-मुस्लीम मतभेगांशी काहीही संबंध नाही. त्याभोवती अशा गोष्टींची होणारी चर्चा ही जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी केली जात आहे, असे ते म्हणाले. सीएएमुळे मुस्लिमांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असेदेखील त्यांनी नमूद केले.

‘प्लॅनेट मराठी’च्या अक्षय बर्दापूरकर यांना ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या