25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयथेट विमानाखालीच घुसली कार

थेट विमानाखालीच घुसली कार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर एक स्विफ्ट डिझायर कार थेट विमानाखाली घुसल्याची घटना घडली आहे. इंडिगो विमानाखाली घुसली असून ही कार इथे कशी गेली याची माहिती अजून समोर आली नाही. हे विमान दिल्लीवरून पटना येथे जाणार असल्याची माहिती आहे.

ही घटना इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळाच्या टर्मिनल टी-२ वर घडली आहे. ज्या विमानाखाली ही गाडी घुसली आहे ते विमान काही वेळात पटनासाठी उड्डाण करणार होते. पण त्याआधीच ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे तेथील कर्मचा-यांची तारांबळ उडाली आहे. या दुर्घटनेत कोणतीच जिवित हानी झाली नसून अधिकचा तपास पोलिस करत असल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या