25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeराष्ट्रीयदिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे नाहीच

दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे नाहीच

एकमत ऑनलाईन

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी दिशा सालियनने घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर उठलेल्या वादळानंतर दिशाच्या आत्महत्येची नव्याने चर्चा सुरु झाली होती. तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येचा प्रकरणाचा तपास पुराव्याआभावी थांबवला होता. तसेच सुशांतप्रमाणे दिशाच्या आत्महत्येचा तपासही सीबीआयकडे सोपवावा अशी विनंती जनहित याचिका दाखल केली होती. मात्र याचिका सुनावणीयोग्यच नाही असे म्हणत ती उच्चन्यायालयाने
फेटाळली.

याचिकाकर्त्याने पोलिसांना माहिती दिली नाही
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येच्या कारणामुळे अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, मृत्यू संशयास्पद असल्याविषयी कोणालाही काही माहिती असल्यास ती सादर करावी, असे आवाहन याप्रश्नी प्रसिद्धीपत्रक जारी करून आॅगस्टमध्ये केले होते. मात्र, तरीही याचिकादार विनीत धांडा यांनी पोलिसांकडे कोणतीही माहिती दिली नव्हती.

चाणक्य….संकटमोचक हरपला !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या