30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home राष्ट्रीय केंद्र सरकारला सत्तेची नशा

केंद्र सरकारला सत्तेची नशा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शेतक-यांच्या आंदोलनावरून आता राजकारणही तापू लागले आहे. केंद्र सरकारने दिलेले प्रस्ताव शेतक-यांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसेच, आपण बुराडीमध्ये आंदोलन करणार नाही. सरकारने आपल्याला रामलीला मैदान किंवा जंतरमंतरमध्ये आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. शेतक-यांच्या आक्रमक भूमिकेनंतर काँग्रेसनेही सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने नव्या कायद्यांचे समर्थन करताना दिसत आहेत़ यावरून सरकारला सत्तेची नशा असल्याचे दिसत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

दरम्यान, सरकारने त्वरीत तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. भारतातील ६२ कोटी शेतकरी आणि शेतातील श्रमिकांच्या मुद्यावर पंतप्रधानांचा अहंकार आणि आडमुठेपणा आजच्या मन की बात मधून दिसून आला. संसदेने पारित केलेले तिन्ही कायदे योग्य असल्याचे ते म्हणाले यावरून ते दिसून आले, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

जेव्हा लाखो शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत दिल्लीनजीक आहेत अशावेळीही पंतप्रधान हे तिन्ही कायदे योग्य असल्याचे म्हणत आहे. यावरून सरकारला सत्तेची नशा असल्याचे दिसत आहेत. तसेच, शेतकरी आणि श्रमिकांबाबत त्यांना कोणतीही चिंता नसल्याचे दिसत आहे, असेही ते म्हणाले. शेतकरी कायद्याच्या पुनर्विचारावरही त्यांचा आजपर्यंत आडमुठेपणा दिसून येत आहे. रविवारी पार पडलेल्या मन की बात या कार्यक्रमातही त्यांनी सांगितले की या कायद्यांमुळे शेतक-यांना नवी संधी उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे त्यांना नवे अधिकारही मिळणार आहेत, असे सुरजेवाला म्हणाले.

केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या