26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयकेंद्र सरकार कर वाढविण्यात व्यस्त

केंद्र सरकार कर वाढविण्यात व्यस्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जीएसटी दर वाढीवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जीएसटीवरून सरकारला टोला लगावत ते पुन्हा याला गब्बर सिंह टॅक्स असे म्हणाले आहेत.

यासोबतच राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावरूनही सरकारवर ताशेरे ओढले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की सरकार फक्त कर वाढवण्यात गुंतले आहे. देशात नोक-या नाहीत. केंद्र सरकार जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था उद्धवस्त करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

जीएसटीवरून केंद्र सरकारला केले लक्ष्य
राहुल गांधी यांनी देशात जीएसटी दर वाढल्यामुळे महाग होणा-या वस्तूंची यादी शेअर करताना या कराचा उल्लेख गब्बर सिंह टॅक्स असा केला आहे. राहुल गांधी यांनी म्हणाले आहेत की जास्त कर, नोकरी नाही. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कशी नष्ट करायची यावर भाजपचा मास्टरक्लास.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या