24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीययुद्धभूमीवर कारगिली खुबानीचा रंग बहरला

युद्धभूमीवर कारगिली खुबानीचा रंग बहरला

एकमत ऑनलाईन

हरदास : पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या भयंकर झळा सोसणा-या कारगिलची ओळख खुबानीमुळे(जर्दाळू) बदलू लागली आहे. सध्या युद्धभूमीत कारगिली खुबानीचा लाल रंग अधिक बहरत आहे. हा प्रदेश आता आंतरराष्ट्रीय स्तरावर या ‘खुबानी’ ची गोड चव पोचवू लागला आहे.

कारगिलची पहिली ओळख हा युद्धजन्य प्रदेश. ती पुसण्यासाठी पर्यटनाचा आधार तिथे घेतला गेला. सुर, व्हॅली, झंस्कार, आर्यन व्हॅली, द्रास या भागांनी पर्यटकांना आकर्षित केले. आर्थिक प्रगतीला त्याचा हातभार लागला. मात्र आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आणखी प्रयत्न त्यांना करावे लागत होते. त्यासाठी कारगिलची माती कामी आली आणि गावाचे अर्थकारण कोटींमध्ये खेळू लागले. ड्रायफ्रूट म्हणून ओळखले जाणारे जर्दाळू (अ‍ॅप्रिकॉट) हे कारगिलचे एक पीक. इथं त्याला ‘खुबानी’ म्हणतात. मातीचा पोत, वातावरण याचा अभ्यास करून चांगल्या दर्जाचं जर्दाळू पीक घेण्यावर भर देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे दृश्यपरिणाम दिसू लागले आहेत. गतवर्षी २५ टन आणि या वर्षी ३५ टन जर्दाळू आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निर्यात करण्यात आली. यामुळे कारगिल सेक्टरमधील अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला. केवळ जर्दाळूच्या पिकामुळे या जिल्ह्याची वार्षिक उलाढाल १५ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.

जर्दाळूसाठी मॉडेल हरदास
कारगिलपासून सात किलोमीटरवर असलेले हरदास गाव हे तर ‘मॉडेल अ‍ॅप्रिकॉट व्हिलेज’ म्हणून राज्य सरकारने विकसित केले आहे. या गावातील मोहम्मद मेहबूब सांगतात, की हरदास गावातील सर्वच कुटुंबे जर्दाळूची शेती करतात. येथील जर्दाळू उच्च प्रतीचा मानला जातो. या ‘हलमन’ला बाजारपेठेत चांगला भावही मिळतो आहे. त्यामुळे गावाला या पिकामधून मिळणारे उत्पन्न दोन कोटी रुपयांच्यावर गेले आहे. गावाची वाटचाल सधनतेकडे सुरू झाली आहे. ‘साधारणपणे मार्च ते जुलै-ऑगस्ट या काळात हे पीक घेतले जाते. कारगिलमधील सुमारे वीस गावे आता जर्दाळूचे पीक घेत आहेत. आता शेतक-यांना मार्केटिंगच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन आणि कच्चे जर्दाळू सुखवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यातून जर्दाळूच्या व्यापारात मोठी वाढ होईल,अशी अपेक्षा मेहबूब यांनी व्यक्त केली.

जर्दाळूमुळे अर्थव्यवस्था बहरली
कारगिलची अर्थव्यवस्था खुबानीमुृळे बहरली आहे. या वर्षी ३५ टन जर्दाळू आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये निर्यात झाले. गेल्या दोन वर्षांपासून ही निर्यात होण्यास सुरवात झाली. सरकारने त्यासाठी शेतक-यांना पाठबळ दिले. आता हॉटेलमध्येही लोक विक्रीसाठी जर्दाळू ठेवत आहेत. त्यामुळे पर्यटकांकडून देखील त्याची खरेदी वाढली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या