21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयसंसदेत दुस-या दिवशीही गदारोळ

संसदेत दुस-या दिवशीही गदारोळ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या दुस-याही दिवशी मंगळवारी विरोधकांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतला आणि विरोधी पक्षनेते, मंत्री, न्यायाधीश, पत्रकारांसह प्रमुख मान्यवरांच्या फोन टॅपिंग प्रकरणी सरकारला धारेवर धरले. या मुद्यावरून संसदेत तात्काळ चर्चा करण्यासोबतच संयुक्त संसदीय समितीच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधक करीत आहेत. मात्र, केंद्र सरकारने हेरगिरीचे दावे फेटाळून लावले आहेत. त्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागले.

पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांत मंगळवारीही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सकाळी कामकाज सुरू होताच कॉंग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात इस्रायली सॉफ्टवेअर पेगॅससच्या माध्यमातून सरकार हेरगिरी करीत असल्याचा आरोप केला आणि यावर तात्काळ चर्चा करण्याची मागणी लावून धरली. यावेळी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, सपा आदी पक्षांचे सदस्य पोस्टर, बॅनर घेऊन अध्यक्षांच्या आसनासमोर दाखल झाले. त्यामुळे लोकसभेचे कामकाज प्रथम २ वाजेपर्यंत त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या मुद्यावरून विरोधकांनी सदनात आणि बाहेरही आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.

राज्यसभेतही सकाळी कामकाज सुरू होताच विरोधकांनी हेरगिरीच्या प्रकरणावरून सरकारला घेरले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे दोनवेळा कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतरही कामकाज सुरू करण्यात आले. मात्र, विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. हे सॉफ्टवेअर इस्त्रालयकडून खरेदी करण्यात आले का, अशी विचारणा विरोधी पक्षांकडून केली गेली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेना खा. संजय राऊत यांनी लोकशाहीची बदनामी होतेय, हे आम्हाला शिकवू नये, हजारो लोकांचे फोन टॅप झाले. या चो-या बंद करा, असा आरोप केला.

चर्चेची मागणी फेटाळली
लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरणी तात्काळ चर्चेची मागणी फेटाळून लावली. केंद्र सरकारने सोमवारीच यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे विरोधक अधिक आक्रमक झाले, तर अकाली दलाच्या सदस्यांनी शेतकरी कायद्याविरोधात घोषणाबाजी केली.
पेगॅससमधील हेरगिरीची

फ्रेंच सरकार करणार चौकशी
पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे राजकारणी, मंत्री, मीडियातील नागरिकांचे फोन हॅकिंग प्रकरण केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही जोर पकडू लागले आहे. फ्रान्स सरकारनेही मीडिया कर्मचा-यांच्या हेरगिरीच्या आरोपाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंच अन्वेषक १० वेगवेगळ्या आरोपावरून ही चौकशी करणार आहे. पेगॅससद्वारे गोपनीयतेचा भंग झाला आहे का, हे यातून शोधण्यात येईल, असे सांगण्यात आले.

नांदेड शहर पुन्हा गोळीबाराने हादरले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या